Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीPooja Sawant Swami Letter : अभिनेत्री पूजा सावंतच स्वामींना खास पत्र!

Pooja Sawant Swami Letter : अभिनेत्री पूजा सावंतच स्वामींना खास पत्र!

मुंबई : स्वामींचे भक्त जगभरात आहेत. सेलेब्रिटीही त्यात मागे नाही. अशातच एका अभिनेत्रीने स्वामींना एक खास पत्र लिहलं आहे. मात्र स्वतःसाठी काही न मागता मुक्या प्राण्यांसाठी तिने मागणी केली आहे. दगडी चाळ, क्षणभर विश्रांती अशा अनेक चित्रपटांतून पूजाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.अलीकडेच आलेल्या नाच गो बया या गाण्यातून पूजाने प्रेक्षकांना तिची वेगळीच अदा दाखवली. ही अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली असून तिचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियामद्ये असतो. त्यामुळे पूजा दोन्ही देशांमध्ये आपल काम सांभाळून प्रवास करते. पूजा नेहमीच तीच्या दैनंदिन आयुष्यातील क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करते. अभिनेत्री पूजा सावंतने नुकतच एक पत्र स्वामींसाठी लिहल आहे. या पत्रात तीने स्वामींकडे अनोखी मागणी केली आहे.तिने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला असून तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

काय म्हणाली पूजा सावंत ??

प्रिय स्वामी,

परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली, देवाकडे फेसबुक नाही, इन्स्टाग्राम नाही पण, स्वत:चा पत्ता आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर! खरंच किती दिवस झाले ना पत्र लिहून…म्हणून म्हटलं आज थेट तुम्हालाच पत्र लिहिते. आज मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही. पण, तुमच्या दत्त अवतारात जे पायाशी चौघे उभे आहेत ना, त्यांच्यासाठी मी काहीतरी मागणार आहे. स्वामी, या जगात कोणताही मुका प्राणी जेव्हा संकटात असेल, तेव्हा आपल्यातील कोणीतरी त्यांचा देव बनून त्यांच्या मदतीला जाईल आणि त्या मुक्या प्राण्याला मदत करेल. ही बुद्धी जगातील सर्वांना द्या. तसेच मला एवढं सक्षम करा की, मी या भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही. बाकी सगळं ठीक आहे. सध्या माझा पत्ता बदललाय. पण, मी जगाच्या कुठल्याही भागात असले तरी, मन मोकळं करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवायला तुमचा पत्ता मला सापडला आहे.

तुमचीच पूजा.

मुक्कामपोस्ट देवाचं घर, श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट, जिल्हा – सोलापूर

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

पूजाच हे भूतदयेवरच प्रेम पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स करत पूजेची पाठ कौतुकाने थोपटली आहे. आगामी काळात पूजा कोणकोणत्या चित्रपटातून झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -