Pimpri-Chinchwad : सावधान! पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा

पिंपरी : ऑनलाइन मागवलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळला. या घटनेमुळे संबंधित कुटुंब आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला.


इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे यांनी शुक्रवारी रात्री ५९६ रुपयांचा पिझ्झा ऑनलाइन मागवला. पिझ्झा मिळाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत पिझ्झाचा आस्वाद घेत होते. त्यावेळी त्यांना काहीतरी कठीण वस्तू दातात लागल्याचे जाणवले. तो चाकूचा तुटलेला तुकडा असल्याचे दिसून आले. या धक्कादायक घटनेनंतर अरुण कापसे यांनी तत्काळ पिझ्झा कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मात्र सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर व्यवस्थापक कापसे यांच्या घरी आला. पिझ्झामधील तुटलेला चाकूचा तुकडा पाहून व्यवस्थापकही अचंबित झाला. पिझ्झा कट करण्याच्या कटरचा तो तुकडा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कापसे यांना पिझ्झाचे पैसे परत करण्यात आले.



संबंधित घटनेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे. चाकूचा तुकडा पिझ्झामध्ये आढळल्याने ऑनलाइन पिझ्झा कंपनीच्या सेवेबद्दल आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याप्रकरणी कार्यवाहीसाठी, अरुण कापसे यांनी पुणे जिल्हा अन्न प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या