Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Pune : पुण्यात मुंब्रा घटनेची पुनरावृत्ती!

Pune : पुण्यात मुंब्रा घटनेची पुनरावृत्ती!

कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी.. म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप 


पुणे : मुंब्य्रात तरुणाने फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावली. ही घटना ताजी असतानाच, पुण्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील वाकडेवाडी येथील एअरटेल शोरुमचा टीम लीडर शाहबाज अहमद याने मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय केल्याचा आरोप होत आहे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला 'मनसे स्टाईल' बेदम चोप दिल्याची माहिती समोर आली आहे.


एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला हिंदीच बोलायचं, मराठी बोललात, तर कामावरून काढून टाकेन, अशी धमकी टीम लीडर शाहबाज अहमद याने दिली आहे. याशिवाय हिंदू धर्मीय सणांना सुट्टी न देणे, गेले ३ महिने संबंधित मराठी भाषिक कर्मचाऱ्यांचा पगार न करणे असेही आरोप व्यवस्थापनावर आहेत.



या सगळ्या प्रकारानंतर एअरटेलच्या कर्मचाऱ्यांनी मनसे सेनेकडे तक्रार केली. यावर शाहबाज अहमदने मराठी भाषिक मुलांना धमकी दिली की कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी... कामावरून काढून टाकतो बघू कोण येतंय, असाही दावा केला जात आहे.


दरम्यान पुण्यातील मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी मुलांचा पगार सोमवार पर्यंत द्या नाहीतर एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील ३ एअरटेल ऑफिस फोडून टाकणार, असा मनसे स्टाईल इशारा दिला असल्याची बातमी समोर आली आहे.

Comments
Add Comment