मुंबई : अनेकदा जेवल्यानंतर जेवण जिरवण्यासाठी किंवा पचवण्यासाठी अनेक पेयांचा उपयोग करतात. त्या पेयांनी उत्साहित आणि ताजेतवाने वाटत असले तरी ते आरोग्यास हानिकारकच आहे. सब्जाच्या बिया आपल्या शरीरासाठी योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे पचनप्रक्रिया सुरळीत राहते.
Flax Crop Profit : पैसे देणारे पीक आहे जवस, तरीही शेतकऱ्यांची पाठ का?
सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही तुम्ही सब्जाचे पाणी पिऊ शकता. शक्यतो सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सब्जाचं पाणी पिण्याची योग्य वेळ आहे.अशाने दिवस छान आणि निरोगी जातो. अन्नाचे पचन सहजरित्या होण्यासाठी मदत मिळते. फिट राहण्यासाठी शरीराच्या पचन संस्थेचं कार्य योग्य पद्धतीने होणं आवश्यक असते. सब्जायुक्त पाणी प्यायल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे आपल्या शरीरात अन्नाद्वारे अतिरिक्त कॅलरीज् जात नाही.लहान मुलं सब्जाचं पाणी पिण्यास नाकारत असतील तर सरबत सारख्या पेयांमधून सुद्धा देऊ शकता
हा सब्जा फक्त शरीरासाठीच नाही तर चेहऱ्यासाठी देखील उपयुक्त आहे. कोरियन फेशिअलच्या रेसिपी मध्ये अशा प्रकारच्या मास्कची नोंद आहे. तिथल्या तरुणी चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी अशाप्रकारचा मास्क वापरतात.