उद्धव गटाला सतावतेय पक्ष फुटीची भीती

मुंबई : उद्धव गटाला पक्ष फुटण्याची भीती सतावत आहे. नव्या वर्षाची सुरुवात होत नाहीत तोच कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकटे राजन साळवीच नाही तर आणखी काही जण शिवसेना किंवा भाजपात प्रवेश करणार आणि उद्धव गटाला कायमचा 'जय महाराष्ट्र' करणार अशीही चर्चा आहे.



निवडणूक आयोगाने घोषणा केली नसली तरी एप्रिल - मे २०२५ मध्ये मुंबई - ठाण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणुकांची शक्यता आहे. या निवडणुकांची घोषणा झाल्यास उद्धव गटातील अनेकजण सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानसभेत ५७ आमदार निवडून आले तर उद्धव गटाचे २० आमदार निवडून आले. उद्धव गटाचे बहुसंख्य आमदार हे मुंबईतले आहेत. यामुळे राज्याच्या उर्वरित भागातील शिवसैनिकांना एकनाथ शिंदे यांचेच नेतृत्व मान्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाची सुरुवात होताच उद्धव गट फुटणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. उद्धव गटात असलेले राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. उद्धव गटाचे वेगवेगळ्या शहरांतील माजी नगरसेवक भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच पक्षांतर करणार असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे