Shirdi : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबांना १३ लाखांचा सुवर्णहार

शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या झोळीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मूळचे जम्मू आणी काश्मीर आणी सध्या शिर्डी येथील रहिवासी असलेल्या श्रीमती टिकू या साईभक्त महिलेच्या परिवाराकडून १३ लाखांचा सुवर्णहार अर्पण केला आहे.




दरम्यान, श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात.दि. १ जानेवारी २०२५ रोजी नववर्षाच्‍या निमित्‍ताने मुळचे जम्‍मु काश्मिर येथील परंतू सध्‍या शिर्डी येथील रहिवाशी साईभक्‍त श्रीमती बबीता टिकू व परीवार यांनी श्री साईचरणी २०६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्‍याचा हार अर्पण केला याची किंमत १३ लाख ३० हजार ३४८ रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला.यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Independence Day Special : OTT वर पाहा 'हे' 6 देशभक्तीपर सिनेमे; अंगावर येईल काटा!

1. भारत भाग्य विधाता – ZEE5 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट कामा हॉस्पिटलमधील

CJP : 'सीजेपी'च्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे

मुंबई : राज्यातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी

सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव काय आहे?

सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून आली आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी पाहायला