Friday, June 20, 2025

जळगावमध्ये नववर्षाची सुरुवात राड्याने

जळगावमध्ये नववर्षाची सुरुवात राड्याने
जळगाव : जळगाव जिल्ह्यात नववर्षाची सुरुवात राड्याने झाली. जिल्ह्यातील पाळधी गावात अफवा पसरली आणि दंगल झाली. अज्ञातांनी दगडफेक आणि जाळपोळ केली. यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या घटनेत बारा ते पंधरा दुकानं जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचण्याआधी हिंसा तसेच जाळपोळ करणारे पळून गेले होते. या घटनेनंतर पाळधी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. सध्या पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे.



हाती आलेल्या माहितीनुसार निवडक वाहने वेगाने गावातून गेली. याप्रसंगी वाहनांच्या दिशेने बघून काही तरुणांनी शिवीगाळ केली. या प्रकारावरुन दोन गटांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. हिंसेप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.



अफवांवर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. कायदे पाळा. अफवा पसरवू नका. आपल्याला मिळालेल्या संवेदनशील माहितीची पोलिसांकरवी खातरजमा करुन घ्या. बेवारस वस्तूंना हात लावू नका; असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >