नगदी पीक असूनही जवसकडे शेतकऱ्यांची पाठ

वाडा : जवस पीक हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. जवसचा उपयोग तेल काढणे आणि धागा निर्मितीसाठी देखील केला जातो. जवस हे पौष्टिक असून, यातून आठ प्रकारची प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवस तेलात 58% ओमेगा तीन, ओमेगा सहा, कोलेस्टेरॉल आणि अँटीऑक्सिडंट असतात.



जवसला बाजारात चांगली मागणी असते. भावही चांगला आहे परंतु वाडा तालुक्यात जवस पीक घेतलं जात नाही एका दुसरा शेतकरी हे पीक घेतो. कृषी विभागाकडून तेलबिया पीक लागवडीकडे शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे पीक घेताना अडचणी येत असल्याने या पिकाकडे पाठ ठेवण्याचे चित्र दिसत आहे.



जवस ला भाव काय ?

विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात दर आढळून येतात. जवस पिकाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो.

वाड्यात पेरा अत्यल्प

तालुक्यात जवस यातील बियांचे पीक एखात दुसरे शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाची पेरणी एकदम अत्यल्प आहे.

भाजीपाला, हरभरा, वालाकडे कल

जवस उत्पादक शेतकऱ्यांना मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. एक पद्धतीने खळे करून मळणीचे काम होत होते. मात्र, यामध्ये बैलजोडी आणि मजुरांची गरज भासते. बैलजोडी व मजूर मिळत नाही अशा अडचणीचा सामना करावा लागतो. - काळुराम पाटील, शेतकरी

उत्पादन अपेक्षित होत नाही जवसाकडे पीक म्हणून बघितले जात नाही. शेतकऱ्यांचा नगदी पीक घेण्याकडे कल असतो. रब्बी हंगामात भाजीपाला, हरभरा, वाल अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. - प्रदीप गोरे, शेतकरी
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व