वाडा : जवस पीक हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. जवसचा उपयोग तेल काढणे आणि धागा निर्मितीसाठी देखील केला जातो. जवस हे पौष्टिक असून, यातून आठ प्रकारची प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. जवस तेलात 58% ओमेगा तीन, ओमेगा सहा, कोलेस्टेरॉल आणि अँटीऑक्सिडंट असतात.
Gadchiroli ST Bus : स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर गट्टा ते वांगेतुरीतील गावकरी करणार एसटी प्रवास!
जवसला बाजारात चांगली मागणी असते. भावही चांगला आहे परंतु वाडा तालुक्यात जवस पीक घेतलं जात नाही एका दुसरा शेतकरी हे पीक घेतो. कृषी विभागाकडून तेलबिया पीक लागवडीकडे शेतकऱ्यांना वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे पीक घेताना अडचणी येत असल्याने या पिकाकडे पाठ ठेवण्याचे चित्र दिसत आहे.
Gadchiroli Naxalite : राज्यात ११ जहाल नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण!
जवस ला भाव काय ?
विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात दर आढळून येतात. जवस पिकाला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो.
वाड्यात पेरा अत्यल्प
तालुक्यात जवस यातील बियांचे पीक एखात दुसरे शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाची पेरणी एकदम अत्यल्प आहे.
भाजीपाला, हरभरा, वालाकडे कल
जवस उत्पादक शेतकऱ्यांना मळणी यंत्र उपलब्ध होत नाही. एक पद्धतीने खळे करून मळणीचे काम होत होते. मात्र, यामध्ये बैलजोडी आणि मजुरांची गरज भासते. बैलजोडी व मजूर मिळत नाही अशा अडचणीचा सामना करावा लागतो. – काळुराम पाटील, शेतकरी
उत्पादन अपेक्षित होत नाही जवसाकडे पीक म्हणून बघितले जात नाही. शेतकऱ्यांचा नगदी पीक घेण्याकडे कल असतो. रब्बी हंगामात भाजीपाला, हरभरा, वाल अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. – प्रदीप गोरे, शेतकरी