Friday, March 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGadchiroli ST Bus : स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर गट्टा ते वांगेतुरीतील गावकरी करणार...

Gadchiroli ST Bus : स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर गट्टा ते वांगेतुरीतील गावकरी करणार एसटी प्रवास!

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली बसला दाखवला हिरवा झेंडा

गडचिरोली : राज्यभरात अनेक भागात एसटी बसची (ST Bus) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र अजूनही काही ग्रामीण भागात बसची सोय नसल्याचे दिसून येते. त्यामुळे गावकऱ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. गडचिरोलीतील (Gadchiroli) गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावर पक्के रस्ते आणि पुलमार्ग नसल्यामुळे तेथील गावकरी लालपरीच्या प्रवासाला मुकलर होते. मात्र आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या गावकऱ्यांना नववर्षाचं मोठ्ठ गिफ्ट मिळालं आहे.

RBI : आजपासून ‘या’ प्रकारचे बँक खाते होणार बंद; आरबीआयचा निर्णय!

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर गट्टा ते वांगेतुरी गावात एसटी बस धावली आहे. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत केवळ गर्देवाडापर्यंत बस प्रवास उपलब्ध होता. तर छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटरपर्यंत पक्क्या रस्त्याचे स्वरुप नसल्यामुळे या भागात एकही एसटी बस सेवा कार्यरत न्हवती. या भागात माओवाद्यांची हुकूमत चालत होती. दोन वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपला डॉमिनन्स वाढवण सुरू केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानेही गट्टा ते वांगेतुरी दरम्यान ३२ किलोमीटर रस्ता निर्माण केला. त्यानंतर आता गट्टा ते वांगेतुरी मार्गावर पक्का मार्ग तयार झाला असून स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर या मार्गावर लालपरी धावली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले असून उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. त्याचबरोबर बसमधील इतर प्रवाशांसोबत संवाद साधला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -