Sukanya Mone : सुकन्या मोनेंच्या लेकीने परदेशात मिळवली मास्टर्स पदवी

मुंबई : अभिनेत्री सुकन्या मोनेंनी मराठी मालिका, चित्रपट तसेच मराठी नाटकांमध्येही काम केलं आहे.आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयासह सुकन्या मोने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी आपल्या लेकीने ऑस्ट्रेलियात मास्टर्स डिग्री मिळवल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.



सुकन्या मोने मुलाखतीत नेहमी त्यांच्या लेकीचं कौतुक करत असतात. त्यांची मुलगी ज्युलिया सध्या परदेशात शिक्षणासाठी गेली आहे. नुकतंच तिने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्युलियानेऑस्ट्रेलियात मास्टर्स डिग्री मिळवली आहे.आपली लेक चांगल्या मार्कांनी पास झाल्याबद्दल अभिनेत्रीने आनंद व्यक्त करत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये लाडक्या लेकीसोबतचे खास फोटो, व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलंय, "जुलिया संजय सुकन्या मोने....Master degree in animal science from University of Queensland Brisbane Australia.... पदवी ग्रहण समारंभाला गेले होते.... त्याची काही स्मरणचित्र... हळूहळू सगळी पाठवत जाईन.... आमच्या आनंदात तुम्हालाही सामील करायला आवडेल."सुकन्या मोनेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील कलाकारांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.





दरम्यान, सुकन्या मोने यांची लेक जुलियाने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. आई-वडिलांपेक्षा वेगळ्या क्षेत्रात तिने करियर करायचं ठरवलं आहे.'मास्टर इन अ‍ॅनिमल सायन्स अँड मेजर इन वाइल्डलाइफ बायोलॉजी' या विषयात तिने पदव्युत्तर पदवी ग्रहण केली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून सुकन्या मोनेंची लेक परदेशात शिक्षण घेत होती. अखेर तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आहे.

Comments
Add Comment

काउंटडाऊन सुरू! ‘वध २ ’चा दमदार नवा पोस्टर रिलीज, संजय मिश्रा–नीना गुप्ता मुख्य भूमिकेत

रहस्य, विचार आणि तीव्रता… ‘वध २ ’चा नवा पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला मुंबई : थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी

“शेकडो दारं, अनेक सदस्य… आणि एकच बॉस!" बिग बॉस मराठी परततोय !

पहा ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठी आणि JioHotstar. मुंबई : मराठी मनोरंजनाची ओळख बनलेला, ज्याची

Agastya Nanda : बच्चन कुटुंबियाचा आभिनयाचा वारासा पुढे घेऊन जाण्यास नकार;अगस्त्य नंदा काय म्हणाला ?

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहेत. स्वतः बिग बी,

सात वर्ष ५ लाख रुपये थकवल्याप्रकरणी संतप्त अभिनेता शंशाक केतकर यांनी निर्माता मंदार देवस्थळी वर गंभीर आरोप ...

 मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘होणार सून

वकील बनून सत्यासाठी लढणार राजसी भावे

विविध चित्रपट आणि नाटकांमधून लक्षवेधी भूमिका साकारणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता वकील बनून सत्यासाठी

धर्मेंद्र यांच्या घरात खरंच पडली का फूट ? अखेर हेमा मालिनी स्पष्टच बोलल्या

Hema Malini On Dharmendra Separate Prayer Meet : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अ