Mumbai News : प्रदूषण नियमकांचे पालन न करणाऱ्यांवर पालिका करणार गुन्हा दाखल!

१ जानेवारीपासून कडक अंमलबजावणी करणार


मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता काही भागांमध्ये खालवली जात असून अशा प्रदूषित भागांवर आता मुंबई महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रदूषणाच्या पाश्ववभूमीवर पालिकेने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे . मुंबईतील बोरिवली पूर्व आणि भायखळा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषित हवा निर्माण झाल्याने येथील सर्व खासगी आणि शासकीय प्रकल्प कामे तथा विकासकामे यांच्यावरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच २०० पेक्षा खाली हवेती प्रदूषित मानांक कमी आलेल्या ठिकाणांमध्ये म्हणजेच वरळी आणि कुलाबा ,नेव्ही नगर आदी भागांमध्ये विकासकामांवर विशेष लक्ष ठेवले जात असून लवकरात या सर्व बांधकामांवर बंदी आणली जाईल, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.



ते पुढे म्हणाले की नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून एकूण ८७७ बांधकाम प्रकल्पांची पाहणी. झाली सुरु असून २८ मुद्यांची मार्गदर्शक सूचना, ‘ईएमपी’चे पालन होत आहे की नाही, याची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे नियमांचे पालन न करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना प्रारंभी लेखी सूचना व नंतर ‘कारणे दाखवा नोटीस’ आणि ‘काम थांबवण्याची नोटीस’ बजावली जात आहे. आतापर्यंत सुमारे २८६ ठिकाणी ‘काम थांबवण्याची नोटीस’ दिली आहे. जर काम थांबवण्याची नोटीस दिल्यानंतर विकासकांनी काम सुरू ठेवल्यास संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असून १ जानेवारी पासून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.


आयुक्तांनी यावेळी बोलतांना, मुंबईत सुमारे २२०० खासगी विकासक तथा संस्था यांची विकासकामे सुरू असून या व्यतिरिक्त शासकीय नागरी सुविधा कामे आणि पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी दुषित प्रदूषित हवामानाचा निर्देशांक २०० च्या वर आढळून आलेल्या ठिकाणांची म्हणजे बोरिवली पूर्व आणि भायखळा आदी भागांमध्ये सर्व खाजगी व शासकीय विकासकामे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येथील सर्व विकासकामे तातडीने बंद करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली. तर प्रदूषित हवामानाचा निर्देशांक २०० च्या खाली आहे अशा वरळी आणि कुलाबा नेव्ही नगर येथील कामांना प्रदूषण नियंत्रणात आणण्याचा सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न झाल्यास तेथील कामे आहे तातडीने बंद करण्यात येतील अशा प्रकारची माहिती दिली.


हिवाळ्यात वाऱ्याचा कमी वेग आणि कमी तापमान यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी. त्यासमवेतच थंडीच्या कालावधीत कोरडे वारे आणि ढगाळ हवामान या कारणांमुळे वायू प्रदूषणात वाढ होते. वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर भायखळा, शीव पुलाच्या कामासाठी रात्रीचा ब्लॉक; एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

मुंबई : भायखळा आणि शीव स्थानकावरील फुट ओव्हर ब्रिजचे गर्

वर्धापन दिनी चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लाखांची मदत

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्रात आज पूरग्रस्थ स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात

एमपीएससीची २८ सप्टेंबरची परीक्षा या दिवशी होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. नव्या

राज्यातील दोन महिला आयएएस अधिकाऱ्यांची बदली

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या

मुंबईत ॲप-आधारित वाहन चालकांवर कारवाई; नियम मोडल्यास थेट दंड आणि एफआयआर!

मुंबई : राज्य शासनाच्या नव्या आदेशांनुसार, ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे पालन न

गडचिरोलीतील भामरागडला यंदाच्या वर्षी पाचव्यांदा पुराचा फटका

गडचिरोली : मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसलेला असतानाच विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यालाही