Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNew Year Party : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कंडोम, ओआरएस आणि...

New Year Party : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कंडोम, ओआरएस आणि सॅनिटरी पॅड्सचे वाटप!

मोठ्या टीकेनंतर थेट पार्टी रद्द करण्याचा निर्णय

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये (New Year Party) येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले आहेत. पुण्यातील मुंढवा परिसरात असणाऱ्या हाय स्पिरीट या पबमधील हा प्रकार आहे.

३१ डिसेंबरच्या आधी ग्राहक अधिकाधिक आपल्याकडे खेचण्यासाठी पब व्यवस्थापक अशा प्रकारच्या युक्ती लढवत असतात. त्याचपद्धतीने पुण्यातील स्पिरिट कॅफे या पबकडून कंडोम, ओआरएस आणि सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले.

Lonavala : सावधान! लोणावळ्यात थर्टी फस्ट साजरी करायला जाताय? ‘या’ ठिकाणी असणार बंदी

संबंधित प्रकार समोर येताच आणि पोलिसांची चौकशी सुरु होताच कंडोम वाटणं गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करतोय. जनजागृती व्हावी यासाठी आम्ही कंडोम, सॅनिटरी पॅड्स वाटत आहे, असा दावा संबंधित पबकडून करण्यात आला होता.

थर्टी फर्स्टसाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त

ही गोष्ट समोर आल्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात आली, त्यानंतर आता ही पार्टी रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबकडून करण्यात आलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाबसुद्धा नोंदवले गेले आहेत. कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा दावा पब व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -