मुंबई: जसजसे तापमान कमी होत जाते तसतसे शरीरात उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांची गरज भासते. थंडी सुरू झाली की आपण जसे स्वेटर घालतो त्याच प्रमाणे शरीराला आतून उष्णता देण्याचीही गरज असते. खरंतर अनेक पद्धती आहेत ज्यामुळे आपले शरीर आपण आतून गरम ठेवू शकतो. यामुळे आरोग्य चांगले राहील.
तुम्ही ऐकले असेल की जेवणातून आपल्याला ऊर्जा मिते. मात्र खाण्यातून असे काही पदार्थ गेले पाहिजेत की ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. खरंतर शरीराचे तापमान वाढवण्यासाठी खाण्यामध्ये काही मसाले वापरले पाहिजेत. यामुळे शरीरात उष्णता वाढवते.
आपण जिऱ्याचा वापर फोडणीसाठी करतो. मात्र थंडीच्या दिवसांत जिऱ्याचे वापर केल्याने शरीर उष्ण राहण्यास मदत होते. पाण्यामध्ये जिरे उकळून प्यायल्याने फायदा होतो.
थंडीत आपण आल्याचा वापर विविध पद्धतीने करतो. चहामध्ये आले वापरले जाते. अथवा काढ्यामध्येही आल्याचा वापर केला जातो.
तुम्ही मसालेदार चहाबद्दल ऐकले असेल. दालचिनी चहामध्ये टाकल्याने स्वाद वाढतो आणि शरीर गरम राहण्यास मदत होते. दालचिनीमुळे रक्त प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.
काळी मिरीला चहा, भाज्या तसेच सलाडमध्येही वापरू शकतो. हे खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढतो. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
थंडीच्या दिवसांत वेलचीचा चहा पिणे चांगले असते. यामुळे केवळ शरीर गरमच राहत नाही तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…