Thursday, March 20, 2025
Homeक्रीडाAustralia vs India : मेलबर्नमध्ये भारताचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी

Australia vs India : मेलबर्नमध्ये भारताचा दारुण पराभव, मालिकेत ऑस्ट्रेलियाने घेतली आघाडी

मेलबर्न : बॉर्डर – गावसकर ट्रॉफी स्पर्धेत चार कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलियाने २ – १ अशी आघाडी घेतली आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने हा कसोटी सामना १८४ धावांनी जिंकला. भारताने पर्थमधील कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाने अॅडलेड आणि मेलबर्नची कसोटी जिंकली. ब्रिस्बेन येथील कसोटी अनिर्णित राहिली. आता सिडनीत होणाऱ्या कसोटीत भारताचा विजय झाल्यास मालिक बरोबरीत सुटेल पण हा सामना अनिर्णित राहिला अथवा भारताने गमावला तर ऑस्ट्रेलिया यंदाची बॉर्डर – गावसकर ट्रॉफी जिंकेल.

Outdoors Shawarma : उघड्यावरचा शॉरमा खाताय तर सावधान!

मेलबर्न कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद २३४ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३६९ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद १५५ धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८४ धावा केल्या. रिषभ पंतने ३० धावा केल्या. इतर फलंदाज वैयक्तिक दोन आकडी धावा पण करू शकले नाही. केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज शून्यावर बाद झाले. कर्णधार रोहित शर्मा फक्त नऊ धावा करू शकला तर स्टार फलंदाज विराट कोहली पाच धावा करुन बाद झाला. रवींद्र जडेजाने २, नितीश रेड्डीने १, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५, आकाश दीपने ७ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. नॅथन लायनने दोन तर त्राविस हेड आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी एक बळी घेतला.

UPI New Rule : आरबीआयने बदलला यूपीआयचा ‘हा’ नियम; युजर्सना होणार फायदा?

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मेलबर्न कसोटच्या पहिल्या डावात ४९ आणि दुसऱ्या डावात ४१ धावा केल्या. त्याने दोन्ही डावात भारताच्या प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद केले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच (प्लेअर ऑफ द मॅच) या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -