‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट लवकरच ओटीटीवर

मुंबई : अभिनेता विक्रांत मेस्सी याची प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. १५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात हाताळण्यात आलेला विषय अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळेच त्यावर अनेक टीका झाल्या. मात्र आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे.


'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटावर वेगवेगळ्या स्तरातून टीका झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करू शकला नव्हता. आता हाच चित्रपट १० जानेवारी २०२५ पासून ZEE5 या ओटीटी मंचावर पाहता येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरना यांनी केलेले आहे. २००२ साली साबरमती एक्स्प्रेसशी निगडीत असलेल्या गोध्रा हत्याकांडावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटाची ओटीटीवरील स्ट्रिमिंग डेट समोर आली असली तरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.


या चित्रपटात विक्रांत मेस्सीने समर कुमार हे पात्र साकारलेले आहे. तर या चित्रपटात राशी खन्ना, रिद्धी डोगरा असे दिग्गज कलाकार आहेत. राशी खन्नाने अमृता गिल तर रिद्धी डोगराने मनिका राजपुरोहित ही पात्रे साकारलेली आहेत. या चित्रपटाची कथा गोध्रा हत्याकांडावर आधरलेली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च झाल्यापासून त्यावर अनेक स्तरांतून टीका झाली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर ही टीका चांगलीच वाढली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट पाहिलेला आहे. केंद्रीय मंत्र्यांसाठी या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आदी बडे नेते उपस्थित होते.


Comments
Add Comment

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड

‘लग्नपंचमी’च्या निमित्ताने ग्लॅमरस अमृता खानविलकर प्रथमच रंगभूमीवर

‘चंद्रमुखी’ आता ‘सूर्यजा’च्या भूमिकेत! मराठी रंगभूमीवरची दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ला ३० वर्षे पूर्ण

शाहरुख-काजोल यांनी लंडनमध्ये त्यांच्या सिग्नेचर स्टाइलच्या पुतळ्याचे केले अनावरण बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी मैत्री