Thursday, March 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRavindra Waikar car accident : खासदार वायकरांच्या कारला अपघात

Ravindra Waikar car accident : खासदार वायकरांच्या कारला अपघात

मुंबई : शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात झाला. मुंबईतील जोगेश्वरी परिसरात एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारानजीक पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ हा अपघात झाला. एका आयशर टेम्पोची आणि वायकरांच्या कारची धडक झाली. या अपघातात जीवितहानी झालेली नाही.

Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट

अपघात झाला त्यावेळी कारमध्ये खासदार रवींद्र वायकर होते. ते सुखरुप आहेत. अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. अपघात प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Navi Mumbai Airport : इंडिगोचे प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले!

कोण आहेत रवींद्र वायकर ?

रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार आहेत. याआधी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते आणि मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते. पण एप्रिल २०२४ मध्ये त्यांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. रवींद्र वायकर १९९२ पासून सलग चार वेळा मुंबई महापालिकेत नगरसेवकपदाची निवडणूक जिंकले आहेत. ते २००६ पासून मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष झाले. त्यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला. ते २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये गृहनिर्माण तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री होते. रवींद्र वायकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. रवींद्र वायकर हे लोकसभा निवडणुकीत ४८ मतांनी विजयी झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -