ठाणे : ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष नंतर ठाणे महापालिका झाल्यावर या मनपाचे पहिले महापौर झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान (८५) यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ठाण्यात सतीश प्रधान यांचे अंत्यदर्शन घेतले.
Ravindra Waikar car accident : खासदार वायकरांच्या कारला अपघात
सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात १९८० मध्ये ज्ञानसाधना महाविद्यालयाची स्थापना झाली. शिवसेनेचे माजी खासदार, ठाणे महापालिकेचे पहिले महापौर, ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात ठाणे शहरात महापौर मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली. सतीश प्रधान यांच्या नेतृत्वात ठाणे शहरात अनेक विकासकामं झाली. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत करण्याचे कामंही सतीश प्रधान यांच्या कार्यकाळात झाले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सतीश प्रधान यांच्या पश्चात मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, कन्या, जावई आणि दोन नाती असे कुटुंब आहे.