Punjab Bandh : शेतकऱ्यांचा पंजाब बंद; १५० ट्रेन रद्द!

  155

चंदीगढ : काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा (गैरराजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या वतीने पंजाबमध्ये ‘रेले रोको’ आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी शेतकऱ्यांनी विविध रेल्वे मार्गांवर ठिय्या देऊन रेल्वे मार्ग रोखले होते. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. आज किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा यांनी पंजाब बंदची हाक दिली आहे.



शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल हे किमान आधारभूत मूल्यासाठी कायदेशीर हमीसह आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. मात्र अद्यापही केंद्र सरकारने काहीच निर्णय न शेतकऱ्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका धारण केली आहे. शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिली असून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक रोखून प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतूक विस्कळीत करणार आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १५० ट्रेन रद्द केल्या आहेत. मात्र यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कोणत्या ट्रेन रद्द?


उत्तर रेल्वेने ३ वंदे भारत एक्स्प्रेससह नवी दिल्लीहून कालका, चंदीगड आणि अमृतसरकडे धावणाऱ्या ३ शताब्दी एक्स्प्रेस आणि पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये धावणाऱ्या अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.


दरम्यान, यावेळी प्रवाशांना त्रास न होण्यासाठी अंबाला पोलिसांनी दिल्ली आणि चंदीगड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना NH-44 मार्गे पंचकुला, बरवाला, मुल्लाना, यमुनानगर, रादौर, लाडवा आणि पिपली येथे पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी

हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि भरमौर परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भरमौर परिसर

बिहारच्या ३ लाख मतदारांना निवडणूक आयोगाची नोटीस

परदेशी नागरिक असल्याच्या संशयावरून बाजवली नोटीस पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण

पंतप्रधान मोदींना जपानमध्ये खास भेट म्हणून मिळाली दारुम बाहुली

टोकियो / नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शुक्रवारी (दि.२९)