अर्थव्यवस्थेसाठी चालना देणाऱ्या तरुण निर्मिकांचे योगदान उर्जापूर्ण आणि धडाडीचे - पंतप्रधान

  46

भारतात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन


नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात, भारताच्या सर्जनशील आणि मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या टप्प्याची उत्साहवर्धक बातमी सांगितली. राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत पुढील वर्षी 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट (WAVES), ही जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद आयोजित करणार आहे.



वेव्हज परिषद : भारताच्या सर्जनशील प्रतिभेसाठी जागतिक व्यासपीठ


WAVES परिषदेची तुलना, जगातील आर्थिक दिग्गज एकत्र जमणार्‍या दावोस सारख्या जागतिक कार्यक्रमांशी करताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले की "भारताची सर्जनशील प्रतिभा जगासमोर मांडण्याची एक नामी संधी चालून येत आहे. माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील दिग्गज तसेच जगभरातले सर्जनशील निर्मिक, या निमित्ताने भारतात जमतील. भारताला जागतिक आशयघन निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दिशेने हे शिखर परिषद एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारताच्या सर्जनशील समुदायाची गतिशील भावना प्रतिबिंबित करून, WAVES च्या तयारीमध्ये तरुण निर्मात्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. त्यांनी देशातील तरुणांचा उत्साह आणि वाढत्या निर्मात्या अर्थव्यवस्थेत त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला, भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना एक प्रमुख कारक घटक आहे.

भारताच्या सर्जनशील कलाकारांची धडाडी दिसून येणाऱ्या WAVES च्या तयारीमध्ये, तरुण निर्मिकांच्या असलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर त्यांनी भर दिला. भारत, 5 ट्रिलियन (5 लाख कोटी) डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, महत्वाचा घटक ठरणाऱ्या देशातील तरुणांचा उत्साह आणि वाढत्या निर्मिक अअर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाबद्दल, त्यांनी अभिमान व्यक्त केला,

ते म्हणाले की, "तुम्ही युवा निर्माते असाल किंवा प्रस्थापित कलाकार, बॉलिवूडशी संबंधित असाल किंवा प्रादेशिक सिनेमाशी , दूरचित्रवाणी उद्योगातील व्यावसायिक असाल, अॅनिमेशन, गेमिंग किंवा मनोरंजन तंत्रज्ञानातील नवोन्मेषक असाल , मी तुम्हाला वेव्ज - WAVES परिषदेचा भाग होण्यासाठी प्रोत्साहित करतो." मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगातील सर्व संबंधितांनी या शिखर परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

वेव्ज परिषद भारतातील सर्जनशील प्रतिभांसाठी एक जागतिक व्यासपीठ म्हणून काम करण्यास तसेच सहकार्याला चालना आणि जागतिक दर्जाचे आशय निर्मिती केंद्र म्हणून देशाच्या क्षमता प्रदर्शित करण्यास सज्ज आहे. तसेच, अॅनिमेशन, गेमिंग, मनोरंजन तंत्रज्ञान, प्रादेशिक आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटांतील भारताची प्रगती देखील अधोरेखित करेल. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला पोषक वातावरण देण्याच्या आणि माध्यम व मनोरंजनाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून देशाचे स्थान मजबूत करण्याप्रति सरकारची बांधिलकी पंतप्रधानांच्या या आवाहनाने अधोरेखित केली.



सिनेमातील दिग्गजांचा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन्मान


पंतप्रधानांनी 2024 मधील भारतीय चित्रपटसृष्टीतील काही प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वांच्या 100 व्या जयंतीचे स्मरण केले आणि त्यांना भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. राज कपूर यांनी त्यांच्या अजरामर चित्रपटांद्वारे भारताची सुप्तशक्ती जगासमोर मांडल्याचे त्यांनी नमूद केले. महम्मद रफी यांचा जादुई आवाज आजही सर्व पिढ्यांना मंत्रमुग्ध करत आहे. अक्किनेनी नागेश्वर राव यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेताना भारतीय परंपरा प्रतिबिंबित केल्या. तसेच, तपन सिन्हा यांनी एकात्मता आणि जागरूकता प्रेरित करणाऱ्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील चित्रपटांची निर्मिती केली. पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की या दिग्गजांनी केवळ भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ घडवला नाही तर भारताच्या सांस्कृतिक वारशालाही बळ दिले. त्यांनी पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी शाश्वत ठेवा मागे सोडला आहे.

यानिमित्त हे देखील नमूद केले पाहिजे की 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये मानवंदना, चित्रपटांचे प्रदर्शन, आणि संवादात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर - ANR) आणि मोहम्मद रफी या चित्रपट जगतातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या असामान्य वारशाला आदरांजली वाहण्यात आली.

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे