Pune-Solapur Highway : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची पूर्णपणे दुर्दशा!

Share

लाखो रुपयांची टोलवसुली; पण देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

पुणे : सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने या टोल रोडची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. लाखो रुपयांची टोल वसुली केली जाते, मात्र देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षित प्रवासाबाबत राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला काही घेणे – देणे राहिलेले नाही, असे चित्र दिसून येत आहे.

या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता उखडलेला आहे. पुणे ते सोलापूर या दरम्यान साधारण २६० किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. दौंड तालुक्यात सन २०१० ते २०१२ दरम्यान महामार्गाचे रुंदीकरण झाले. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रुंदीकरणानंतर रस्ता मोठा झाला, वाहनांचा वेग वाढला. टोल वसुली जोमाने सुरू झाली. मात्र, अपघात कमी झाले नाहीत. महामार्गाची दुरवस्था अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याची गांभीर्याने व तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. महामार्गाच्या मुख्य लेन आणि सेवा रस्त्यावर सतत लहान, मोठे खड्डे पडलेले दिसून येतात. डांबर, खडी उखडलेल्या अवस्थेत असते, अशा गंभीर प्रकारामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.

मोकाट जनावरांचा वावर वाढला असून तेही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. नादुरुस्त वाहनांसाठी तत्काळ सुविधा मिळत नसल्याने ती वाहने तासनतास महामार्गावर उभी असतात. अशा वाहनांना धडकून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. दौंड तालुक्यातील यवत, चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ, मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोलीसह महामार्गावर इतर ठिकाणी असे अनेक ब्लॅक स्पॉट आहेत. तिथे तातडीने उपाययोजन करण्याची गरज आहे. यासंदर्भात कोणी काही बोलत नसल्याने या संबंधित प्रशासनाचा अधिकारी वर्ग, टोल विभाग सुस्त झाला आहे.

वारंवार भीषण अपघातात जखमी होतात, अपंगत्व येते, जीव गमवावा लागतो. पोलिस पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. मात्र, अपघातांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. अपघातानंतर फरार झालेल्या वाहनांच्या तपासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

46 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago