Mumbai News : महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत १८९ मेट्रिक टन राडारोड्याचे संकलन, विल्हेवाट!

  47

नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल


मुंबई : शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, विशेषतः धूळ नियंत्रणासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समर्पित प्रयत्न सुरू केले आहेत. वायू गुणवत्ता सुधारणा अभियान अंतर्गत आज संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात १८९ मेट्रिक टन राडारोड्याचे (डेब्रीज) संकलन करण्यात आले, तर सुमारे २४३ किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले. तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.



वातावरणातील बदलांमुळे मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.


मुंबई शहरात गेल्या ५४ आठवड्यांपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ स्थानिक संस्था प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे.


या अंतर्गत आज सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, स्वच्छतेचे नियमभंग करणाऱ्या नागरिकांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.



१ हजार ६८२ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी


यामध्ये, १ हजार ६८२ कामगार, कर्मचाऱ्यांनी १९० संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, मेकॅनिकल स्वीपर, ई-स्वीपर, लीटर पीकर मशीन, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन यासह अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती.

Comments
Add Comment

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये