पुणे : पुणेकरांसाठी (Pune News) आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या पुणे शहरात दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मात्र पुणेकरांचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पुण्यातून दोन नव्हे तर सहा वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) धावणार आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, पुण्याहून सध्या पुणे – हुबळी, पुणे – कोल्हापूर आणि मुंबई – सोलापूर व्हाया पुणे अशा दोन वंदे भारत धावत आहेत. यामध्ये आता आणखी चार एक्स्प्रेसचा समावेश केला जाणार आहे. या अतिरिक्त नव्या एक्स्प्रेस शेवगा, बडोदा, सिकंदराबाद आणि बेळगाव या मार्गांवरून धावणार आहेत.
दरम्यान, पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर आणि जलद गतीने होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच या अतिरिक्त वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच सुरू केल्या जाणार आहेत.
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…