Monday, March 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPakistan Afghanistan Conflict : पाकिस्तान - अफगाणिस्तान लढाईत पाकिस्तानच्या १९ सैनिकांचा मृत्यू

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तान – अफगाणिस्तान लढाईत पाकिस्तानच्या १९ सैनिकांचा मृत्यू

इस्लामाबाद : पाकिस्तान – अफगाणिस्तान सीमेवर लढाई सुरू आहे. या पाकिस्तान – अफगाणिस्तान लढाईत पाकिस्तानच्या १९ सैनिकांचा आणि तीन नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या वायुदलाने अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तालिबानच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील खोस्त प्रांतातील अली शिर जिल्ह्यातील अनेक लष्करी चौकी पहारे जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. तर पाकिस्तानच्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात अफगाणिस्तानमध्ये डंड-ए-पतन जिल्ह्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

अतिरेक्यांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अफगाणिस्तानच्या ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली.

अफगाणिस्तानमधून पाकिस्तानवर सतत अतिरेकी हल्ले सुरू आहेत. हे हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांना अफगाणिस्तान शस्त्र, पैसा, अन्न – पाणी – औषधे आणि लपण्यासाठी जागा पुरवत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. तर पाकिस्तानचा आरोप अफगाणिस्तानने फेटाळला आहे.

इस्लामाबाद येथील सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटी स्टडीजच्या एका अहवालानुसार पाकिस्तानमध्ये २०२३ मध्ये अतिरेकी हल्ल्यांमध्ये जीवितहानी होण्याचे प्रमाण हे २०२२ च्या तुलनेत ५६ टक्के जास्त आहे. अतिरेकी हल्ल्यांमध्ये सुमारे १५०० नागरिक आणि सुमारे ५०० जवानांचा मृत्यू झाला आहे.

मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सीमावाद सुरू आहे. इंग्रजांनी आखून दिलेली ड्युरंड रेषा अफगाणिस्तानला अमान्य आहे तर अफगाणिस्ताच्या भूमिकेला पाकिस्तानचा विरोध आहे. आता हा वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे.

ड्युरंड रेषा किंवा ड्युरंड लाईन म्हणजे काय ?

ब्रिटिश इंडियाचा अधिकारी मॉर्टिमर ड्युरंड याने निश्चित केलेली सीमारेषा म्हणजे ड्युरंड रेषा किंवा ड्युरंड लाईन. अफगाणिस्तान आमिरात आणि ब्रिटिश यांच्यातले संघर्ष थांबवण्यासाठी १८९३ साली ड्युरंड रेषा आखण्यात आली. पण ही रेषा ब्रिटिशांनी बळाच्या जोरावर पश्तुन समाजाला विभागून अफगाणिस्तानची ताकद कमी करण्यासाठीच केली होती. आता पाकिस्तानने नव्याने चर्चा करून नवी सीमारेषा आखावी, अशी भूमिका अफगाणिस्तानने घेतली आहे. पश्तुन हे अफगाणिस्तानचे आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळायला हवी, अशीही भूमिका अफगाणिस्तानने घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -