PM Narendra Modi : आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढणाऱ्या नेत्याचे कार्य नेहमी लक्षात राहील!

  60

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे काल रात्री दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज सकाळपासून दिग्गज नेत्यांकडून श्रध्दांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली अर्पण केली असून शोक व्यक्त केला आहे.



'देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत शोक व्यक्त करतो आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले,' असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


त्याचबरोबर 'मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी मी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो' अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.



अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले


डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख १९९१च्या आर्थिक संकटाच्या काळात भारताला दिलेल्या दिशादर्शनासाठी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात आर्थिक धोरणांत क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. ते संकटाच्या काळातही देशहितासाठी कायम कार्यरत राहिले', असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.