Marathi language : मराठी पाऊल पडते पुढे? मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मराठी कच्चे!

छत्रपती संभाजीनगर : काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मात्र महाराष्ट्रात अजूनही अनेकांना मराठी भाषा (Marathi language) बोलण्याचे आणि वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.



मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांतील जि.प. शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती मराठवाड्यातील पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. तर इंग्रजी, गणितापासून विद्यार्थी चार हात लांब असल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील भाषाज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. दुसरीतील ८६.८७, तर तिसरीतील ८७.५१ टक्के विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येतात. पाहणीतील निष्कर्ष पहिलीतील १ लाख १६ हजार ७४१ विद्याथ्यापैकी ७७ हजार ३७० विद्यार्थी ४ ते ५ शब्द असलेले छोटी वाक्ये वाचतात. ३९ हजार ३७१ विद्यार्थ्यांना छोटी वाक्येदेखील वाचता येत नाहीत. हे प्रमाण ३३.७३ टक्के आहे.

Comments
Add Comment

Reel Star Rohini Death : वैवाहिक मतभेद की व्यवसायातील ताण? रिल्सस्टार रोहिणी पाराध्येंनी का संपवलं आयुष्य? पोलिसांकडून तपास सुरु

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात

Nanded : नांदेडमधून एक मोठी बातमी समोरआली आहे. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या ताफ्यातील चार

PM Awas Yojana-G : घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून निधी मंजूर; रखडलेली कामे पुन्हा होणार वेगात

मुंबई : ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री

Nashik : रिंगरोड भूसंपादनाच वाद चिघळला, प्रांतधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलिसांनी उधळला

Nashik : नाशिक भोवतालच्या प्रस्तावित बाह्य रिंग रोड भूसंपादनाचा वाद चिघळताना दिसत आहे. भूसंपादन प्रक्रियेविरोधात

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईनं उचललं टोकाचं पाऊल; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

अक्कलकोटमधील धक्कादायक घटना; विहिरीत उडी घेत आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू... Crime News : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट

Nagpur Heatwave : नागपुरात उष्णतेची तीव्र लाट, गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू ?

नागपूर : नागपूरमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय