Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीAkkalkot Swami Samarth Temple : अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया...

Akkalkot Swami Samarth Temple : अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

सोलापूर : अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी रखडलेले भूसंपादन अखेर अक्कलकोट नगरपालिकेने हाती घेतले आहे. यात ११०६२ चौरस मीटर जमीन संपादित करण्यासाठी नगरपालिकेने प्रसिद्धीकरण केले आहे.

एकीकडे राज्य शासनाने अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासकामांच्या आराखड्यास मंजुरी दिली असताना दुसरीकडे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून रखडलेले भूसंपादन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्यामुळे आगामी काळात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार आहे.

मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही – मुख्यमंत्री

अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जागा १९७८ साली शासनाने विकासासाठी आरक्षित केली होती. त्याप्रमाणे ही जागा संपादन करण्याची जबाबदारी श्री स्वामी समर्थ मंदिर समितीवर निश्चित करण्यात आली होती. त्यासंबंधी मंदिर समितीची नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. परंतु भूसंपादन रखडले होते. आवश्यक कालावधी टळल्यानंतरही भूसंपादन न झाल्यामुळे मूळ जागामालकांनी जागा खरेदी करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन नोटीस बजावली होती. कायदेशीर नियमानुसार आरक्षण निश्चित झाल्यानंतर पुढे एक वर्षाच्या मुदतीत जागा संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण रद्द होऊ शकते. त्यामुळे अक्कलकोट शहराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचा विचार करूनच नगरपालिकेने जागा संपादनासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -