मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे (Mumbai Metro) पसरल्यापासून लोकलची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण मेट्रोने प्रवास करतात. अशातच विरारकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ (Metro 9) मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच मेट्रो ९ चा पहिला टप्पा अखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून विरारकरांना गर्दीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
Thane Water Cut : ठाण्यातील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर ते काशीगाव असा पहिला टप्पा असणार आहे. तर काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान असा दुसरा टप्पा असणार आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सहा महिन्यात या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत या मेट्रोला पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कसा असेल पहिला टप्पा?
एमएमआरडीएकडून (MMRDA) पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगावदरम्यानच्या मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाणार आहे. या मार्गातील कामे अंतिम टप्प्यात आहे. तर रुळांची कामे सुरू आहेत. आता यंत्रणेचीही कामे लवकरच सुरु केली जाणार आहेत. मेट्रो ९च्या पहिल्या टप्प्यात ४ स्थानके असणार आहेत. दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव ही स्थानके असणार आहे.
मेट्रो ९ मार्गिका मेट्रो मार्ग २ ए (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग (अंधेरी पूर्व ते दहिसर) पूर्वेला थेट जोडण्यात येणार आहे. तसेच या मेट्रो मार्गिकेमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न रेल्वेला देखील जोडण्यात येईल.
मेट्रो ९ मार्गिकेवरील स्थानके कोणती?
दहिसर, पांडुरंग वाडी, मिरागाव, काशीगाव, साई बाबा नगर, मेदितिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम.