Subedaar Teaser: वयाच्या ६८व्या वर्षी अ‍ॅक्शनसाठी अनिल कपूर तयार

मुंबई: अनिल कपूर यांनी त्यांच्या कारकीर्दीत कायम वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.अनिल कपूर यांनी वयाची साठी ओलांडली असली तरीही त्यांची एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे.अशातच अभिनेत्याच्या आगामी ‘सुबेदार’ चित्रपटाचा फर्स्ट लूक(Subedaar Teaser) आता समोर आला आहे.ही झलक पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


अनिल कपूर हे आज मंगळवार २४ डिसेंबरला ६८ वर्षांचे झाले आहेत. प्राइम व्हिडिओने हा खास प्रसंग चाहत्यांसाठी अधिक खास बनवला आहे. वास्तविक, OTT प्लॅटफॉर्मने ‘सुभेदार’ चित्रपटाची पहिली झलक शेअर केली आहे.हा चित्रपट चित्रपटगृहात नाही तर OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. सध्या रिलीजची तारीख समोर आलेली नाही. चाहते ती लवकरच जाहीर करणार आहेत.ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहे.त्याच्यासोबत राधिका मदन त्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.


 


अनिल कपूर यांच्या 'सुबेदार' सिनेमाची पहिली झलक भेटीला आली आहे.अनिल कपूर या चित्रपटात एक वेगळ्या आणि नव्या अंदाजात दिसणार आहेत. या व्हिडीओत दिसून येतं की, अनिल कपूर बंद दाराआड बसलेले असतात. त्यांच्या दरवाजावर माणसं ठोठावर असतात. "ये म्हाताऱ्या दार उघड.. आतमध्ये लपून बसलाय.." अशा शब्दात काही माणसं दारावर जोरात थपडा मारत असतात. पुढे अनिल कपूर यांच्या लूकची झलक दिसते. त्यांच्या हातात बंदूक असते आणि चेहऱ्यावर रागीट भाव असतात. शेवटी "फौजी तयार..!" असं वाक्य येऊन हा व्हिडीओ संपतो. त्यामुळे आता या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेणे उत्कंठाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी