Devendra Fadnavis : सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ग्वाही

नागपूर : मी पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात शंका होत्या. हा मंत्रीही नव्हता, नवखा आहे, मग कारभार कसा करणार. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचे, सातत्याने विदर्भावरील अन्यायावर बोलणारा व्यक्ती मुख्यमंत्रिपदी बसला की आपल्यावर अन्याय केला. पण पहिल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की, आपण विदर्भात खूप काम केले आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय होऊन दिला नाही. राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन आव्हान निर्माण केली जातात. गेल्या दहा वर्षात पाहिले आहे, मी अशा आव्हानांचा सामना धैर्यपूर्वक करतो आणि सत्ता कधीही माझ्या डोक्यात जात नाही. सत्ता हे सेवेचे माध्यम आहे असेच आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे पुढे ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमूद केले.



पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणापासून ते पालकमंत्रीपदापर्यंत अनेकविध विषयांवर संयमितपणे आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले. महायुती सरकारचे खातेवाटप झाल्यानंतर अनेकांनी नाराजीचा सूर आळवला. छगन भुजबळ यांनी मोर्चेबांधणी करत, अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांचेही कौतुक केले. भाजपाकडे शिल्लक असलेले मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा सक्रीय झाले असून, सरकारला इशारा दिला आहे. परभणी आणि बीड प्रकरण विरोधकांनी लावून धरले आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली.



पालकमंत्रीपदाबाबत निर्णय बावनकुळे घेणार


चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल. त्यांनी मला बीडला पाठवले तरी मी बीडला जाईन. पण माझ्या मते साधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे कोणते पालकमंत्रीपद ठेवत नाहीत. असे असले तरी माझी इच्छा अशी आहे की, गडचिरोलीचे पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावे. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल. अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मन की बात बोलून दाखवली. तसेच आम्ही तिघे सोबतच काम करत आहोत. अडीच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही २०-२० चा सामना खेळलो. तो विश्वचषक आम्ही जिंकलो. पण आता कसोटीचा सामना असणार आहे. हा सामना ड्रॉ होणार नसून, हा जिंकणारा सामना असेल, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या