Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून चक्काचूर!

संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ समोर


कझाकिस्तान : कझाकिस्तानमध्ये विमानाचा भीषण अपघात (Kazakhstan Plane Crash) घडल्याचे समोर आले आहे. अझरबैजान एअरलाइन्सचे विमान अझरबैजानहून रशियाला जात असताना लँडींगदरम्यान विमानाचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले असून सदर घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, अझरबैजानी प्रवासी विमान बाकूहून ग्रोंजीला जात होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. परंतु विमान लँडिंग करत असताना ते धावपट्टीवर जोरात कोसळले अन् एका क्षणात विमानाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


रशियन वृत्तसंस्थांनी या अपघाताचा खुलासा केला आहे. त्यानुसार, अपघात झालेल्या विमानात ६७ प्रवासी आणि ५ क्रू मेंबरचा समावेश होता. यामधील ३८ जणांचा मृत्यू झाला असून एका लहान मुलासह २९ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. तर सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर तज्ज्ञ, ट्रॉमाटोलॉजिस्ट, न्यूरोसर्जनसह सर्व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच एअर ॲम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी मदतकार्य आणि बचावकार्य सुरू आहे.


Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेचा इराणवर सर्वात मोठा हल्ला; थेट तेल डेपोला भीषण आग! आकाशात धुराचे आगीचे लोट

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरूच आहे. इराणही या हल्ल्यांना चोख उत्तर देत

इराणमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

तेहरान (वृत्तसंस्था): अमेरिका आणि इस्रायलसोबत तणावपूर्ण परिस्थिती असताना इराणमध्ये शनिवारी भूकंपाचे सौम्य

Iran US Israel War: भारत आणि इराणमध्ये समझोता झाल्याची चर्चा, तेल टेन्शन संपल्यात जमा; होर्मुजमधून भारतीय जहाजं प्रवास करत असल्याची माहिती

तेहरान: गेल्या आठवड्याभरापासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरु आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशिया

Iran Israel War : इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी फेटाळून लावली अमेरिकेची बिनशर्त आत्मसमर्पणाची मागणी

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेच्या

दुबई विमानतळ बंद, विमानवाहतूक ठप्प

दुबई : अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध पश्चिम आशियात सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्याचे तळ ज्या

Iran Israel War : "सॉरी, आम्ही यापुढे हल्ला करणार नाही"; इराणच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी इस्रायल आणि अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान शेजारी देशांवर