Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0 : बळीराजासाठी नववर्षाची भेट! सरकारने सुरु केली 'ही' गेम चेंजर योजना

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून (State Government) शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थी तसेच तरुण विद्यार्थ्यांसाठीही अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा विकासदर वाढावा यासाठीही सरकार कार्यरत असते. अशातच आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmer Scheme) नववर्षाची भेटवस्तू दिली आहे. सरकारने बळीराजासाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांसाठी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – २.०' ची (Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana 2.0) घोषणा केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळू शकणार आहे. राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी १६,००० मेगावॅट वीज देण्यात येते. तर गेल्या दोन वर्षात सर्व फीडर सौर उर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सरकारने नवी योजनेची घोषणा केली आहे.


व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर आणि इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात उंब्रठा व नारंगवाडी गावातील शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. दरम्यान, सरकारच्या या उपक्रमाकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

येत्या आठ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी होणार

नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त