Thursday, March 27, 2025
HomeदेशChristmas 2024: भारतासह जगभरात आज ख्रिसमसचा उत्साह

Christmas 2024: भारतासह जगभरात आज ख्रिसमसचा उत्साह

मुंबई: देशासह जगभरात आज २५ डिसेंबरला ख्रिसमसचा(Christmas 2024) सण साजरा केला जातआहे. चर्चेमध्ये मध्यरात्री विशेष प्रार्थना करण्यात आले. भारतातही गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह पाहाया मिळत आहे.

ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्यावर वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी चॉकलेट आणि वाळूच्या मदतीने सांताक्लॉज साकारला. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही कोलकाताच्या मोस्ट होली रोजरीच्या कॅथेड्रलमधील सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाल्या.

यातच गाझा-इस्त्रायल युद्धामुळे सलग दुसऱ्या वर्षी प्रभू येशूंचे जन्मस्थळ असलेल्या बेथलहम येथे ख्रिसमस साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. जन्मस्थळावरील चर्च ऑफ दी नेटिव्हिटीमध्ये सजावटही करण्यात आली नव्हती.

राजधानी दिल्ली तसेच आर्थिक राजधानी मुंबईतही ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईत भव्य सजावट, रोषणाई, हर्षोल्लासपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या वांद्रे येथील कार्टर रोड, सेंट अँड्र्यूज चर्च, कोलाबा कॉजवे, माऊंटमेरी चर्च या ठिकाणी ख्रिसमसचे सेलीब्रेशन केले जाते. मुंबईतील प्रतिष्ठित चर्चेमध्ये एक म्हणजे वांद्रे येथील माऊंट मेरी चर्च आहे. हे शहरातील सर्वात जुने आणि सर्वाधिक पाहिले जाणारे चर्च आहे. ख्रिसमसदरम्यान येथे विशेष प्रार्थना सभा असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -