मुंबई: थंडीच्या दिवसांत इतरांप्रमाणेच तुमचे केसही(Hair Care) कोरडे आणि निस्तेज होतात का? या अशा रुक्ष केसांमुळे तुमच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतो. सोबतच केस गळूही लागतात. तापमानाचा पारा घसरताच केसांतील ओलावाही कमी होऊ लागतो. यामुळे ते रुक्ष, निस्तेज बनू लागतात. यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून तुमचे केस चमकदार बनवू शकता.
गरम तेलाचा वापर करा
केस धुण्याच्या एक तास आधी आपल्या केसांना तेलाचे पोषण द्या. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, नारळाचे तेल कोमट करून घ्या.
केमिकल फ्री उत्पादने
हलक्या शाम्पूचा वापर करा. जे शँपू सल्फेट आणि पॅराबेन फ्री असतील त्यांचा वापर करा. हेअर कंडिशनरचा वापर करा. यामुळे केसांना मॉश्चरायजेशन मिळेल. केस सतत कलर करू नका अथवा हानिकारक केमिकल्सचा वापर करू नका.
गरम पाण्याचा वापर नको
तुमचे केस गरम पाण्याने धुण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा. थंड पाण्याने आंघोळ करणे सगळ्यात चांगले असते. केसांतील ओलावा कायम राहण्यास मदत होते.
हीट स्टायलिंग कमी करा
केसांना कुरळे, सरळ अथवा व्हॉल्यूम देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हीट स्टायलरचा वापर सतत करू नका. यामुळे केस निस्तेज आणि कोरडे होतात.
केस दररोज धुवू नका
तुमच्या केसांमधून घाण आणि घाम घालवण्यासाठी तुम्ही जर सतत केस धुवत असाल तर ते बंद करा. यामुळे केसांतील नैसर्गिक तेल संपून जाते. आठवड्यातून तीन वेळा केस धुण्याचा सल्ला दिला जातो.