पूँछ : जम्मू काश्मीरमध्ये पूँछ येथे नियंत्रण रेषेजवळ मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला आणि पाच जवान जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या सोळाव्या कॉर्प्सने ही माहिती दिली.
All ranks of #WhiteKnightCorps extend their deepest condolences on the tragic loss of five brave soldiers in a vehicle accident during operational duty in the #Poonch sector.
Rescue operations are ongoing, and the injured personnel are receiving medical care.@adgpi…
— White Knight Corps (@Whiteknight_IA) December 24, 2024
संध्याकाळी अकराव्या मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या वाहनाला नियंत्रण रेषेवरील बलनोई घोरा येथे जात असताना अपघात झाला. वाहन १५० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात चालकासह दहा जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आले होते. माहिती मिळताच लष्कराने तातडीने मदतकार्य सुरू केले. जवान अपघाताच्या ठिकाणी पोहोचले आणि अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. यानंतर अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाल्याचे आणि उर्वरित पाच जण जखमी असल्याचे समजले.