Maharashtra : राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांसाठी चुरस

  360

मुंबई : नागपूरच्या अधिवेशनाचे सूप वाजले आणि महायुती सरकारने खातेवाटप जाहीर केले. पाठोपाठ मंत्र्यांना बंगल्यांचे आणि मंत्रालयातील दालनांचे वाटप झाले. पण कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी जाहीर होणार हा प्रश्न सरकारचे राजकीय विरोधक विचारू लागले आहेत. अर्थपूर्ण हितसंबंध जपण्यासाठी काही मंत्री विशिष्ट जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मागत असल्याचा आरोपही विरोधकांकडून सुरू झाला आहे. ही आरोपांची राळ उडाली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांशी संबंधित मुद्यावर योग्य वेळी निर्णय कळेल, असे संकेत दिले आहेत.




राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री हे पद मिळवण्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा असल्याचे वृत्त आहे. यामुळे नाशिक, जळगाव, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, संभाजीनगर, बीड, पुणे, कोल्हापूर आणि गडचिरोली या १२ जिल्ह्यांमध्ये कोण पालकमंत्री होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.



महाराष्ट्र शासन, मंत्र्यांना नेमून दिलेली खाती ( खातेवाटप )

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)


उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.


मंत्री


चंद्रशेखर बावनकुळे : महसूल


राधाकृष्ण विखे – पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)


हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण


चंद्रकांत (दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य


गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.


गणेश नाईक : वने


गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता.


दादाजी भुसे: शालेय शिक्षण.


संजय राठोड : मृद व जलसंधारण.


धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.


मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.


उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा


जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.


पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.


अतुल सावे : इतर मागास, बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा


अशोक उईके : आदिवासी विकास.


शंभुराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.


ॲड. आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.


दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.


आदिती तटकरे : महिला व बालविकास.


शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).


ॲड. माणिकराव कोकाटे : कृषी.


जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायत राज.


नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य.


संजय सावकारे : वस्त्रोद्योग.


संजय शिरसाट : सामाजिक न्याय.


प्रताप सरनाईक : परिवहन


भरत गोगावले : रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास.


मकरंद जाधव (पाटील) : मदत व पुनर्वसन.


नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे.


आकाश फुंडकर : कामगार.


बाबासाहेब पाटील : सहकार.


प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.


राज्यमंत्री


ॲड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार,


माधुरी मिसाळ : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.


डॉ. पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.


मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).


इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.


योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.


महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप




Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही