Paatal Lok Season 2 : पाताल लोक २ 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अ‍ॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म 'पाताल लोक' वेबसीरिज लाँच झाली होती. लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या या 'पाताल लोक' वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं होत. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती.आता ४ वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन २ चा प्रोमो समोर आला होता. आता पाताल लोक २ च्या रिलीजची अधिकृत तारीख समोर आली आहे.



'पाताल लोक २' ही वेबसीरिज १७ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.'नवीन वर्षात दरवाजे उघडणार..' अशी टॅगलाइन देत प्राइम व्हिडीओने त्यांच्या सोशल मीडियावर 'पाताल लोक २'च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.पहिल्या सीझनप्रमाणेच हा दुसरा सीझन देखील प्राइम व्हीडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनप्रमाणे 'पाताल लोक २'चं दिग्दर्शन सुद्धा अविनाश अरुण यांनी केलंय.पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत यांनी इन्स्पेक्टर हातीराम चौधरी आणि इश्वाक सिंग यांनी कॉन्स्टेबल अन्सारी यांची भूमिका साकारली होती. दुसऱ्या सीझनमध्ये या कलाकारांसोबतच तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ सारखे नवीन चेहरे देखील दिसणार आहेत.





पहिल्या सीझनला प्रेक्षकांसह समीक्षकांची देखील दाद मिळाली होती. याशिवाय, सीरिजला अनेक पुरस्कारही मिळाले होते. पहिल्या सीझन एकूण ९ भागांमध्ये रिलीज झाला होता. त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये देखील ९ भाग असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सीझनचे दिग्दर्शन अविनाश अरुण धावरे यांनी केले आहे. प्रेक्षक आता या सीरिजच्या ट्रेलरची मागणी करत असून, १७ जानेवारीला येणाऱ्या दुसऱ्या सीझनमध्ये नवीन काय पाहायला मिळेल, याची उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या

रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : रिंकू राजगुरूच्या ‘आशा’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. काही

प्राजक्तानं नंदीवरुन घेतलेली एन्ट्री योग्य की अयोग्य ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

मुंबई : नुकताच स्वराज्यरक्षक संभाजी फेम येसूबाई म्हणजेच प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा झाला.

रीलस्टार जोडपं निघाले सराईत चोर! आयफोन 17 प्रो मॅक्स, साडे सहा तोळे सोन्याचे दागिने आणि लाखो रुपये...

अहिल्यानगर: जिल्हा पोलिस दलाने बसमधून महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या एका सराईत जोडप्याला जेरबंद केले आहे. या

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

हास्याचा मनमुराद मेळ साधणारे ‘एकदा पाहावं करून’ लवकरच रंगभूमीवर!

मराठी रंगभूमीवर नातेसंबंधांची कडू-गोड बाजू आणि हलक्या-फुलक्या विनोदांचा सुंदर ताळमेळ साधणारे रत्नाकर मतकरी