Akshaya Deodhar : अक्षया देवधरचा मालिका विश्वात कमबॅक

मुंबई : सर्वांची लाडक्या पाठकबाई, झी मराठीवर पुनरागमन करत आहे. "लक्ष्मी निवास" मध्ये अक्षया देवधर, भावना ची भूमिका साकारत आहे. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अक्षयाने आपला आनंद व्यक्त केला. 'लक्ष्मी निवास' या मालिकेत मी भावना ही भूमिका साकारत आहे. अत्यंत भावनिक मुलगी आहे. आई-वडिलांना समजून घेणारी, सगळ्यांना आपलंसं करणारी, थोडी कमी बोलणारी आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी असलेली, अशी आहे भावना. परंतु पत्रिकेत असणाऱ्या दोषांमुळे तीच लग्न जुळत नाही. अनेक वर्ष प्रयत्न करूनही लग्न जुळत नसल्याने ती आयुष्यात उदास आहे. आपण घरच्यांवर ओझ आहोत किंवा आपल्या आई - वडिलांना आपल्यामुळे त्रास होतोय, अशी भावना तिच्या मनात आहे. यामुळे तिला खूप त्रास होतो. माझी निवड अशी झाली कि मला निर्मात्यांचा फोन आला आणि त्यांनी झी मराठीसाठी ऑडिशन असल्याचं सांगितलं तेव्हा पासूनच नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.


४-५ वर्षांनी पुन्हा झी मराठीवर काम करायला मिळतंय. त्यातून एक वेगळी भूमिका, कौटुंबिक गोष्ट ऐकून खूप छान वाटल. टीमही प्रचंड मोठी आहे. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी आणि इतर पात्र या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम करणार आहे. पुन्हा सेटवर माझं एक नवीन कुटुंब होणार आहे आणि या सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळणार आहे त्याची उत्सुकता वेगळीच आहे. हर्षदा ताईला खूप वर्ष ओळखते पण तिच्यासोबत काम करण्याची कधी संधी आली नव्हती म्हणून छान वाटत. या मालिकेत ती माझ्या आईच्या भूमिकेत आहे. इंडस्ट्रीची मम्मा आहेच पण आता ती माझीही आई होणार आहे तर छान वाटतंय. पहिल्या दिवशी जेव्हा प्रोमो शूट करण्यात आला. नवीन माणसं आणि त्यांच्या बरोबर काम करण्याचा आनंद आणि दडपण होत. नवीन मालिकेत आपण कसे दिसणार कसा होईल प्रोमो ही उत्सुकता सगळ्यांमध्ये होती. मला दडपण होत कारण मी ४-५ वर्षांनी पुन्हा मालिकेत काम करणार आहे.


माझा लूक काय असेल, मी कशी दिसणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूमिका जशी लेखकाने लिहिली आहे तशीच ती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे हे दडपण आहेच. भावनांच्या लुक बद्दल सांगायचे झाले तर एकदम छान लूक आहे. तीच वय ३० आहे. साधी सरळ , सोज्वळ आहे. मी स्वतः ला कधी वेणी मधे बघितल नाहीये पण यात वेणी तिच्या साड्या, तिचे ड्रेस सगळंच लोकांना आवडेल. या मालिकेमुळे लोकांवर खूप छान परिणाम होईल असं वाटतंय कारण वेगळ्या धाटणीची मालिका आहे. प्रत्येक भूमिका सुंदर आहे. प्रत्येक पात्रावर ही मालिका अवलंबून आहे. हाताची बोटं सारखी नसतात तशीच एका घरातील माणसं सारखी नाहीत. परंतु ती माणसं एकत्र आल्याशिवाय हातामधे बळ येत नाही. 'लक्ष्मी निवास' मालिकेत बरीच पात्र आहेत प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. जेव्हा ती एकत्र येतात तेव्हा काय घडत हे या गोष्टीतून लोकांना समजेल. कुटुंब आणि नाती किती महत्त्वाची आहेत. हे या मालिकेतून लोकांपर्यंत पोहोचेल."


Comments
Add Comment

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई:

मुंबईतील २९५ बेकरींवर महापालिकेचा 'प्रहार'; बेकरींना 'पीएनजी-एलपीजी' किंवा इलेक्ट्रिक ओव्हन वापरणे बंधनकारक

मुंबई: स्वच्छ, हरित इंधनाकडे (Cleaner, Green Fuels) वळण्याच्या अनिवार्य आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या शहरातील मोठ्या

मुंबईतील कबूतर प्रकरण चिघळलं; जैन मुनींच्या वक्तव्यांवरून राजकीय वातावरण तापलं

मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर

Kabutarkhana Jain Community Dharm Sabha : कबुतर आमचं चिन्ह! जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, आता आमचाही पक्ष असेल; जैन मुनींची घोषणा!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न (Pigeon Feeding Issue) मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. कबुतरांना

ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी नवीन नियमावलीची घोषणा !

मुंबई : महाराष्ट्रातील ॲपवर आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) शिस्तबद्धता, प्रवासी