Monday, October 27, 2025
Happy Diwali

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांचा आज सिंधुदुर्ग दौरा; होणार जंगी स्वागत!

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांचा आज सिंधुदुर्ग दौरा; होणार जंगी स्वागत!

कणकवली : राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गचे सुपुत्र व कणकवलीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) प्रथमच आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर अणार आहेत. त्याचे खारेपाटण ते दोडामार्ग व्हाया देवगडपर्यंत ठिकठिकाणी जंगी स्वागत होणार आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताची जिल्हा भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण जिल्हाभर त्यांचे अभिनंदन करणारे आणि शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच त्यांचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य सत्कार सोहळा देखील केला जाणार आहे.

कसं असेल स्वागत कार्यक्रम?

  • कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचे हेलीकॉप्टरने राजापुर येथे आगमन झाले असून त्यानंतर ते सिंधुदुर्गकडे प्रयाण करणार आहेत. तसेच खारेपाटण येथे जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर त्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ११ वाजून ३० मिनिट ते १२ वाजेच्या कालावधीत देवगड भाजप कार्यालयात स्वागत होणार आहे.
  • दुपारी १२ वाजून १५ मिनिट ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत तळेबाजार तर दुपारी १२ वाजून ४५ मिनिट ते १ वाजेच्या सुमारास शिरगाव बाजारपेठ येथे स्वागत होणार आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास नांदगाव बाजारपेठ येथे स्वागत होणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते  अडीच वाजेच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी येथील भाजप कार्यालयात स्वागत होणार आहे. तसेच ३ वाजेच्या सुमारास सिंधुदुर्ग बँकेसह सावंतवाडी बांदा येथे स्वागत समारंभ होणार आहे.
  • त्यानंतर मंत्री राणे दोडामार्गकडे रवाना होणार आहेत. तेथे सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास कुडाळ येथे त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर कणकवलीकडे रवाना होणार असून सायंकाळी ७ वाजून ३० मिनिट ते ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानावर त्यांचा भव्य सत्कार होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा