Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीBSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका! 'या' प्लॅनद्वारे ग्राहकांना मिळणार दरमहा 5000GB डेटा

BSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका! ‘या’ प्लॅनद्वारे ग्राहकांना मिळणार दरमहा 5000GB डेटा

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी जिओ मागोमाग एअरटेल, व्हिआयसह इतर कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली होती. यादरम्यान बीएसएनएल (BSNL) या टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर कमी केल्याने जिओ, एअरटेल, व्हिआय कंपनीच्या वापरकर्त्यांनी बीएसएनएलला मोठी पसंती दिली होती. त्यामुळे नावाजलेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना धक्का बसला होता. तर आता पुन्हा बीएसएनएलने नवा प्लॅन अस्तित्वात आणला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही – एकनाथ शिंदे

सध्या अनेकांना इंटरनेटच्या जास्त वापरामुळे काहीवेळा मोबाइल प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा देखील कमी पडतो. त्यामुळे बीएसएनएलने नवा रिचार्ज प्लान उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला 5000GB डेटा मिळू शकणार आहे.

काय आहे रिचार्ज प्लॅन?

बीएसएनएलने ब्रॉडबँड प्लॅन (BSNL Broadband Plan) आणला आहे. यामुळे ग्राहकांना कमी खर्चात हाय स्पीड अनलिमिटेड डेटा मिळू शकणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps चा स्पीड मिळतो. याचा अर्थ, आपण कोणत्याही तणावाशिवाय अवजड काम सहजपणे करू शकता.

फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन

बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन, जो जिओ एअरटेलचे टेन्शन वाढवत आहे, सोबतच उत्तम OTT फायदेही देतो. या कंपनीमध्ये, ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार, लायन्स गेट, वूट ॲप, सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5 प्रीमियम, हंगामा तसेच शेमारू मी आणि याप टीव्हीसह अनेक ॲप्सचे विनामूल्य सदस्यता मिळते. याचा अर्थ असा की, बीएसएनएल तुम्हाला अनलिमिटेड डेटा देत नाही तर ओटीटीच्या स्वतंत्र खर्चातही बचत करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -