Virat Anushka : विराट अनुष्का लवकरच भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार

कॅनबेरा : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सध्या तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत असून तिसऱ्या कसोटीत तो फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. याचदरम्यान विराट कोहली भारत सोडणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह लंडनला शिफ्ट होणार आहे, अशी माहिती आता विराट कोहलीचे लहानपणीचे क्रिकेट प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे.



विराट आणि अनुष्का लंडनला शिफ्ट होणार याची चर्चा खूप दिवसांपासून सुरु आहे, मात्र याबाबत ठोस आणि अधिक माहिती समोर आली नव्हती. मात्र प्रथमच याबाबत कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने खुलासा केला केला आहे. एका मुलाखती दम्यान प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना विराट कोहली कायमचा भारत सोडून परदेशात राहण्याचा विचार करत आहे का? यावर उत्तर देताना प्रशिक्षक म्हणाले, "हो, विराट आपल्या मुलांसह आणि पत्नी अनुष्का सह लंडनमध्ये शिफ्ट होण्याचं प्लॅनिंग करत आहे. तो लवकरच भारत सोडून तिथे शिफ्ट होणार आहे. कोहली सध्या क्रिकेट व्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. तसेच पुढे बोलताना प्रशिक्षक म्हणाले ककी, विराट अजूनही तंदुरुस्त आहे आणि निवृत्ती घेण्याचे त्याचे वय झालेले नाही. मला वाटते की तो आणखी पाच वर्षे खेळेल. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात तो भारताकडून नक्कीच खेळेल. मी त्याला गेल्या २६ वर्षांपासून ओळखतो आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की त्याच्यामध्ये अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे.


विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळत आहे. मालिकेतील पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये मोठी खेळी म्हणून त्याच्या बॅटमधून फक्त १  शतक झळकले आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद १००  धावा केल्या. या एका शतकासह त्याने ३  कसोटी सामन्यांच्या ५  डावात १२६  धावा केल्या आहेत. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७  साली विराट-अनुष्काने लग्न केलं. २०२१ मध्ये त्यांची मुलगी वामिकाचा जन्म झाला तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये
(२०२४) मुलगा अकायचा जन्म झाला. त्यानंतर ते दोघं बऱ्याच वेळेस लंडनमध्ये दिसले आहेत. त्यामुळे लवकरच विराट भारत सोडून तिथे स्थायिक होणार आहे, अशी मोठी माहिती राजकुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे विराटच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये