नवी मुंबई : टीम इंडियाने अखेर आपला खराब फॉर्म मागे टाकत विजयाचा झेंडा रोवला. ऑस्ट्रेलियाकडून टी-20 मालिकेत दारूण पराभव पत्करल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ विजयी मार्गावर आता परतला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ६० धावांच्या फरकाने मोठा विजय नोंदवला आणि यासह ३ सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.यासह टीम इंडियाला हा मालिका विजय तब्बल ५ वर्षानंतर आला आहे.भारताच्या रिचा घोषने वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतक झळकावत हा सामना गाजवला.
Rajesh Deshpande : राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘साती साती पन्नास’ नाटकांचे प्रयोग रंगणार
भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघांदरम्यान सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा निर्णायक सामना गुरुवारी डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे खेळला गेला.या सामन्यात भारताची फलंदाज रिचा घोष (५४) आणि सलामीवीर स्मृती मानधना (७७) यांनी अप्रतिम खेळी खेळली. प्रथम वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार स्मृती मंधानाच्या (७७ धावा) अप्रतिम खेळीमुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.याशिवाय संघाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने ३९ आणि राघवी बिश्तने ३१ धावांची खेळी केली तर अखेरीस यष्टीरक्षक रिचा घोषने शानदार फलंदाजी करत २१ चेंडूंत ३ चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने ५४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून २१७ धावा केल्या. या सामन्यात स्मृतीने सलग तिसरे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक झळकावले. असा पराक्रम करणारी ती दुसरी भारतीय महिला फलंदाज ठरली. दुसरीकडे, रिचाने केवळ १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यासह तिने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० मधील संयुक्तपणे सर्वात वेगवान अर्धशतकही ठोकले.भारताने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक झळकावताना आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली.
दुसरीकडे, भारताने दिलेल्या २१८ धावांच्या भक्कम लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिज मैदानात उतरला तेव्हा त्यांना २० षटकांत ९ विकेट्स गमावून १५७ धावाच करता आल्या आणि त्यांना या सामन्यात ६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजसाठी फक्त चॅनेल हेन्री ४३ धावांची सर्वोत्तम खेळी करू शकली. याशिवाय अन्य कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी खेळता आली नाही. भारतीय संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. अशाप्रकारे टीम इंडियाने हा सामना ६० धावांनी जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. झंझावाती अर्धशतकासाठी रिचा घोषला सामनावीर तर स्मृती मानधनाला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.