Rajesh Deshpande : राजेश देशपांडे दिग्दर्शित 'साती साती पन्नास' नाटकांचे प्रयोग रंगणार

मुंबई :  नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने 'सृजन' ने एक मिशन सुरू केलं. सृजन द क्रियेशन ही नवोदित कलाकारांना प्रशिक्षण आणि संधी देण्याचा प्रयत्न करणारी संस्था गेली चार वर्षे सातत्याने अनेक एकांकिका, नाटके, अभिवाचने, शॉर्ट फिल्म्स करत आहे. अनेक स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवत आहे. ह्या संस्थेतून तयार झालेले कलाकार व्यवसायिक नाटके, मालिका ह्यात स्थिरस्थावर होऊ पहात आहेत.




ह्या वर्षी सृजन द क्रियेशन ज्येष्ठ लेखक संजय पवार लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित साती साती पन्नास ह्या स्त्रियांच्या प्रश्नांवर ज्वलंत भाष्य करणाऱ्या नाटकाचे प्रयोग दिनांक रविवार २२ डिसेंबर ते गुरुवार २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वा. ॲक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली पूर्व येथे होणार आहेत.ह्या नाटकाचे संगीत आणि गीत गायन श्रद्धा नांदूर्डीकर ह्यांनी केले आहे तर नृत्य सिद्धेश दळवी ह्यांनी बसवली आहेत.श्रद्धा माळवदे , चैताली जोशी, गीता पेडणेकर, अर्चना पाटील, गौरवी भोसले, स्वरांगी जोशी, निनाद चिटणीस या नवोदित कलाकारांच्या अभिनयाने हे नाटक सजलं आहे.

शिवशाही कला क्रिडा केंद्र यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले. प्रयोगाची तिकीटे प्रयोगा आधी अर्धा तास हॉल वर उपलब्ध होतील तरी सर्व नाट्य रसिकांनी ह्या प्रयोगांचा आनंद घ्यावा असे संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे ह्यांनी आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ची स्टार कास्ट ‘कौन बनेगा करोड़पति’च्या सेटवर

मुंबई : आमिर खान प्रोडक्शन्सची आगामी मनोरंजक चित्रपट हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस आपल्या खास ऊर्जा आणि खुमासदार

‘हक़’च्या यशानंतर यामी गौतम धरचं मन जिंकणारं वक्तव्य

या वर्षी दमदार अभिनय आणि मोठ्या पडद्यावर लक्षात राहणाऱ्या क्षणांनी भरलेल्या सिनेमांमध्ये एक नाव सातत्याने

मुखवट्यामागील गडद रहस्य ‘केस नं. ७३’

प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला

हिंदवी पाटील आणि सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान... उत्तम संगीत आणि नखरेल अदाकारीने सजलेली लावणी रसिकांना घायाळ केल्याशिवाय राहत

‘दृश्यम ३’मधील कराराचा भंग केल्याप्रकरणी ‘धुरंधर’ अक्षय खन्नाला नोटीस

मुंबई : आगामी 'दृश्यम ३' या चित्रपटासाठी केलेल्या कराराचा भंग केल्याप्रकरणी अभिनेता अक्षय खन्ना याला कायदेशीर

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला