तब्बल ९ वर्षांनी हा मराठी अभिनेता मालिकेमध्ये करतोय कमबॅक

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर 'तू ही रे माझा मितवा' ही मालिका सुरु होणार आहे.या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ही मालिका येत्या २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता अभिजीत आमकर हा मालिकाविश्वात दमदार कमबॅक करणार आहे. तसेच त्याने त्याची उत्सुकता देखील या निमित्ताने व्यक्त केली आहे.

तू ही रे माझा मितवा मालिकेविषयी अभिजीत आमकर म्हणाला की, या मालिकेतून एक अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अर्णव आणि ईश्वरी या एकमेकांच्या प्रेमात जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका.


तसेच अभिजीतने त्याच्या भूमिकेविषयी सांगताना म्हटलं की, अर्णव सात्विका राजेशिर्के असं मी साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे. मालिकेतील अर्णव हा प्रचंड कष्टाळू, प्रामाणिक पण तितकाच रागीट आणि गर्विष्ठ स्वभावाचा आहे. पुढे अभिजीतने सांगितले कि, अर्णव आणि माझ्या स्वभावात बरंच साम्य आहे. अर्णव प्रमाणेच माझ्या आयुष्यात व्यायामाला प्रचंड महत्त्व आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून मी न चुकता व्यायाय करतो.

या मालिकेनिमित्त अभिजीतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटलं की, स्टार प्रवाह मला माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे. ९ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहच्या अरे वेड्या मना मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा हा योग जुळून आला आहे. महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडला जातोय याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे.

Comments
Add Comment

फुलवंतीला झालं एक वर्ष; प्राजक्ता काय म्हणतेय पहा...

मुंबई : उत्कृष्ट कथानक असलेला फुलवंती हा संगीतबद्ध चित्रपट २०२४ मध्ये आला होता. आज त्याला एक वर्ष पूर्ण झालं.

कांतारा चॅप्टर १ जगभरात धडाकेबाज ठरला! अवतार आणि टायटॅनिकलाही मागे टाकत ऋषभ शेट्टीने रचला इतिहास

दक्षिणेतील अभिनेता ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १' हा चित्रपट सर्व स्तरातून प्रचंड प्रेम मिळवत आहे. त्याच्या

"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक

'बिग बी' यांनी ८३ व्या वाढदिवसाला स्वतःला दिली खास भेट !

मुंबई : बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ८३व्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला एक खास भेट दिली आहे.

कल्कीच्या सिक्वेलमध्ये आलिया दिसणार? चर्चांना उधाण

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॉलिवूड ग्लॅम दीपिका पादुकोण आणि बिग बी यांच्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाने २०२४

आमंत्रण नसतानाही बिग बींच्या बर्थडेला 'ती' आली अन् बाथरूममध्ये लपली!

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज त्यांचा ८३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी