Air Pollution : बिल्डरांनो, वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा...

बांधकामांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रमाण कार्यप्रणालीच्या पालनाची सूचना


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी बांधकाम व पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण (air pollution) व ब्लास्टिंगच्या अनुषंगाने नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत.


मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहुन दाखल करुन घेतलेली (Suo Moto) जनहित याचिका क्र.३ मध्ये उच्च न्यायालयाने दि. ११‍ डिसेंबर २०२३ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वायू प्रदूषण कमी करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी व उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने "मानक कार्यप्रणाली" तयार करण्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या २४ एप्रिल २०२४ रोजीच्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्त २ यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती.



सदर समितीने विविध बैठका घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगी धारकांनी विकासकांनी / कंत्राटदारानी अवलंबवयाच्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व एकापेक्षा जास्त खोलीच्या बेसमेंटबाबत उत्खनन / ब्लास्टींग करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मानक कार्यप्रणाली (SOP) व बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण – दंडात्मक कारवाईबाबतच्या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक, नवी मुंबई महानगरपालिका यांनी २६ जुलै २०२४ रोजी, ठराव क्र. ६४५२ अन्वये मंजूरी दिलेली आहे.


त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी कामांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व ब्लास्टींगकरिता अवलंबवायची “मानक कार्यप्रणाली” (“Standard Operating Procedure (SOP)”) आणि बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणा-या वायू व ध्वनी प्रदूषण - दंडात्मक कारवाईबाबतचे परिपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक यांची ०१ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता प्राप्त झालेली आहे.


या परिपत्रकानुसार सुरु असलेल्या बांधकाम तसेच पुनर्बांधकाम प्रकल्पावर नियंत्रण करण्यासाठी विशेष पथकाची (Task Force) नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानुसार संबंधित विभाग अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्या ठिकाणी बांधकामाचे तोडकाम / खोदकाम / बांधकाम सुरू आहे, अशा सर्व प्रकल्पांच्या जागी जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक आठवड्यातून किमान एकदा प्रत्यक्ष पाहणी करुन तसा अद्ययावत अहवाल सहाय्यक संचालक, नगररचना यांना सादर करावयाचा आहे.


बांधकाम / पुनर्बांधकाम प्रकल्पांमध्ये संबंधितांकडून अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास महापालिका आयुक्त यांच्या पूर्वपरवानगीने सदर बांधकाम परवानगी धारकाविरुध्द एमआरटीपी कायदा १९६६ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ अन्वये तसेच परिपत्रकातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


तरी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विकासक / नागरिक यांना महानगरपालिकेच्या वतीने पुन:श्च जाहीर प्रकटन करुन सूचित करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकाम प्रकल्प / विकासकामांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषणास आळा घालण्यासाठी त्याचप्रमाणे खोदकाम / ब्लास्टींगमुळे नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने तसेच प्रकल्पांच्या ठिकाणी होणाऱ्या संभाव्य दूर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची नोंद घेण्यात यावी व त्याचे पालन करावे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत