नागपूर: महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीतर्फे भाजपच्या राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. शिंदे बुधवारी १८ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. आज, मंगळवारी या पदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुपारच्या सत्रात विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत गिरीश महाजन होते. यात विधान परिषद सभापतीपदाबाबत चर्चा करण्यात आली. भाजपकडेच हे पद जाणार असल्याने पक्ष कोणाला यासाठी संधी देणार याबाबत उत्सुकता होती.
राम शिंदे आणि दरेकर या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर संध्याकाळी शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते कर्जत विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. मात्र निवडणुकीच्या आधी त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती. परिषदेत महायुतीचे बहुमत असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जातो. दरम्यान शिंदे यांनी आपल्या उमेदवारीबद्दल ट्विटरवर संदेश जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…