
चालकांनी पुकारला बेमुदत संप
ठाणे : पगारवाढ, दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे (Thane News) परिवहन सेवेच्या सुमारे ७०० चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. (TMT Bus Drivers strike) आनंद नगर टी एम टी डेपोतून ठाणे, कळवा आणि मुंब्रयातील विविध भागातील बसेस रवाना होतात. मात्र आज सकाळपासून डेपो बंद झाल्याने कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. दरम्यान, दुसरीकडे बस चालकांच्या संपामुळे रिक्षा चालकांची चांदी झाली आहे.

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने अंदमानातील समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण ...