Ind vs Aus : बुमराह-आकाशदीपच्या जोडीने रचला इतिहास, २१व्या शतकात केला भागीदारीचा रेकॉर्ड

मुंबई: गाबा कसोटीत जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने बॅटिंगमध्ये ती कमाल केलीये जी २१व्या शतकात याआधी कोणालाच करता आली नाही. बुमराह आणि काश यांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्तं १०व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली. याआधी गाबा कसोटीत भारतासाठी १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी १९९१मध्ये झाली होती. ही भागीदारी मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांनी केली होती.


बुमराह आणि आकाशदीप यांच्याआधी गाबा कसोटीत भारतासाठी १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ३३ धावांची होती. ही मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ यांची होती. आता बुमराह आणि आकाशदीप यांनी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली आहे. बुमराह आणि आकाश चौथ्या दिवशी खेळ समाप्त होताना नाबाद परतले आहेत.



गाबा कसोटीत भारताकडून १०व्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी


जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप - नाबाद ३९ धावा(२०२४)


मनोज प्रभाकर आणि जवागल श्रीनाथ - ३३ धावा (१९९१)


मोटगनहल्ली जयसिम्हा आणि उमेश कुलकर्णी - २२ धावा(१९६८)


वेंकटपती राजू आणि जवागल श्रीनाथ - १४ धावा (१९९१)


इशांत शर्मा आणि उमेश यादव - १४ धावा(२०१४)



फॉलोऑनने वाचला भारत


एकीकडे असे वाटत होते की भारताला फॉलोऑन मिळेल. मात्र जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांच्या शानदार भागीदारीमुळे संघाला फॉलोऑनपासून वाचता आले. दोघांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १०व्या विकेटसाठी नाबाद ३९ धावांची भागीदारी केली.

Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०

टी-२० सामन्यात सोनम येशेचा ८ बळींचा जागतिक विक्रम

भूतानच्या फिरकीपटूने म्यानमारविरुद्ध रचला इतिहास; ४ षटकांत दिल्या ७ धावा भूतान : फिरकीपटू सोनम येशे याने इतिहास

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट