Gujarat Accident : गुजरातमध्ये भीषण अपघात! खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक

६ जणांचा जागीच मृत्यू, तर १० जण गंभीर जखमी


भावनगर : गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात भीषण अपघात (Gujarat Accident) झाल्याची घटना घडली आहे. एक खासगी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली असन या भीषण धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १० जण गंभिर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील तळाजा तालुक्यातील त्रापज गावाजवळ ही घटना घडली. भावनगर-तळाजा महामार्गावर भावनगरहून महुव्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसने डंपर ट्रकला मागून धडक दिली.


घटनेची माहिती मिळताच १०८ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.  जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे