Drumstick Price Fall : शेवग्याच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा!

थंडीमुळे राज्यातील प्रमुख बाजार समितीच्या आवारात शेवग्याची आवक कमी


पुणे : किरकोळ बाजारात ६०० रुपये किलो असे उच्चांकी दर मिळालेल्या शेवग्याच्या दरात घट झाली आहे. शेवग्याच्या दरात घट झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. बाजारात गुजरातमधील शेवग्याची आवक सुरू झाल्याने दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. (Drumstick Price Fall)


आमटी, सांबारमध्ये सढळ हाताने वापरण्यात येणाऱ्या शेवग्याची आवक कमी झाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ६०० रुपये किलो असे उच्चांकी दर मिळाले होते. शेवगा महाग झाल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले होते. शेवगा खरेदीकडे गृहिणींनी पाठ फिरवली होती. उपाहारगृह चालकांकडून शेवग्याचा सांबारऱ्यामध्ये वापर करण्यात येतो. शेवगा महाग झाल्याने उपाहारगृह चालकांकडून शेवग्याला बेताची मागणी होती.



तीन आठवड्यांपूर्वी घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला ३५०० ते ४००० रुपये दर मिळाले होते. हवामान बदल आणि थंडीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख बाजार समितीच्या आवारात शेवग्याची आवक कमी झाली होती. दरम्यान, सध्या शेवग्याचे दर कमी झाले असून, यापुढे दरवाढ होण्याची शक्यता नसल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील शेवगा व्यापारी रामदास काटकर यांनी सांगितले.



गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू


गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गुजरातमधून दररोज १०० ते १२५ डाग (एक डाग ३० ते ३५ किलो) शेवग्याची आवक होत आहे. गुजरातमधील शेवग्याची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. गुजरातमधील शेवग्याचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू असतो. त्यानंतर सोलापूर, नाशिक भागातील शेवग्याचा हंगाम सुरू होतो. तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील शेवग्याचा हंगाम चार महिने असतो. परराज्यातील शेवग्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेवग्याला ग्राहकांकडून जास्त मागणी असते.

Comments
Add Comment

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

जातीयवादामुळे विद्यार्थ्याच्या नोकरीवर गदा?

महाविद्यालयावर आरोप; वंचित आघाडीचे आंदोलन पुणे  : पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या दलित तरुणाला लंडनच्या

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम